देश-विदेश

Vladimir Putin : मोठी बातमी! पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले...

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) फोन केल्याची माहिती मिळत आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असं मत पुतीन यांनी व्यक्त केलं आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या 80व्या स्थापना दिवसाच्या पुतीन यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वर्षाच्या शेवटी भारतात शिखर संमेलन पार पडणार आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या पुतीन यांना आमंत्रण दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज