बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Russia Ukraine War ) युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मोठा धक्का बसला आहे. कार बॉम्बस्फोटात रशियन सैन्याचा एक लेफ्टनंट जनरलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सर्वारोव्ह मॉस्कोमधील त्यांच्या अपार्टमेंटमधून कुठेतरी जाण्यासाठी बाहेर पडत असताना त्यांच्या कारमध्ये स्फोट झाला.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लेफ्टनंट जनरल सर्वारोव्ह हे सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख होते. हा स्फोट नेमका कसा झाला याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.
Summary
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का
सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
लेफ्टनंट जनरल सर्वारोव्ह हे सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल ट्रेनिंग विभागाचे प्रमुख होते