देश-विदेश

Russia Helping India : रशियाचा भारताला पाठिंबा; व्लादिमिर पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भक्कमपणे भारताच्या पाठीशी असल्याची हमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिली.

Published by : Prachi Nate

भारताचा जुना मित्र पुन्हा मदतीसाठी धावून आला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे भारताच्या लढ्याला आता मोठं बळ मिळालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भक्कमपणे भारताच्या पाठीशी असल्याची हमी त्यांनी दिली.

हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना सोडू नका, कठोर शासन करा, असं पुतीन यांनी म्हटल आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करून म्हटले आहे की, पुतिन यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. यासह रशियाने भारताच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये