सौदी अरेबियाने आता 14 देशाच्या नागरिकांच्या व्हिसावर बंदी तात्पुरती बंदी घातली आहे. सौदी अरबीयाने या वर्षी हज यात्रेआधी हा निर्णय घेतला आहे. सरकारने जून 2025 पर्यंत उमराह, व्यापार आणि कौटुंबिक यात्रा व्हिसा जारी करण्यावर बंदी आणणार आहे.
कोणत्या देशांचा समावेश ? :
या बंदीमुळे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया, येमेन आणि मोरोक्कोसह 14 देश प्रभावित होणार आहेत. परदेशी नागरिक प्रथम उमराह किंवा व्हिजिट व्हिसा घेऊन सौदी अरेबियामध्ये प्रवेश करतात आणि नंतर अधिकृत परवानगीशिवाय हजमध्ये सहभागी होण्यासाठी बेकायदेशीरपणे तेथे राहतात.
बंदी घालण्यामागचे कारण :
या सगळ्यामुळे गर्दी वाढते आणि व्यवस्थापित करणे खूप कठीण होते. 2024 मध्ये हज दरम्यान अशाच घटनेत किमान 1,200 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.याशिवाय काही व्हिसावर बंदी घालण्याच्या या पावलामागील आणखी एक कारण म्हणजे सौदीमध्ये बेकायदेशीर नोकरी करणे. अधिका-यांनी सांगितले की व्यवसाय किंवा कौटुंबिक व्हिसा वापरणारे परदेशी सौदी अरेबियामध्ये अनधिकृत कामात गुंतलेले आहेत, व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करतात आणि श्रमिक बाजारपेठेत व्यत्यय आणतात.
नवीन नियमांचे पालन करावे लागणार :
प्रवाशांना नवीन नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याला भविष्यात सौदी अरेबियात प्रवेश करण्यास पाच वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. विशेषत: हजसाठी डिप्लोमॅटिक व्हिसा, रेसिडेन्सी परमिट आणि व्हिसा घेणाऱ्या लोकांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.