देश-विदेश

Shina Bora murder case : इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारी याचिकेला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील इंद्राणी मुखर्जीची परदेशवारी रद्द

Published by : Team Lokshahi

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीला युरोपला जाण्यास सीबीआयने केलेला विरोध उच्च न्यायालयाने योग्य ठरवला. तसेच, विशेष न्यायालयाने याबाबत दिलेला आदेश रद्द करून इंद्राणीच्या परदेशवारीस नकार दिला आहे. इंद्राणीला परदेशात जाऊन काम करणे आवश्यक असल्याचे कोणतेही तार्किक कारणे विशेष न्यायालयाने तिची परदेशी जाण्याची मागणी मान्य केली नाही.

न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवत, इंद्राणीला पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे अथवा ऑनलाईन पद्धतीने भारतातूनच काही कामे करायची असल्यास सरकारने तिला सहकार्य करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष सीबीआय न्यायालयाने १९ जुलै रोजी इंद्राणी हिला तीन महिन्यांसाठी अधूनमधून १० दिवसांसाठी युरोप प्रवास करण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायालयाचा हा आदेश कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आणि मनमानी असल्याचा दावा करून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी सीबीआयने वकील श्रीराम शिरसाट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती.

इंद्राणीवर खुनाचा गंभीर खटला सुरू असून तिच्यावर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, तिला परदेशात जाण्यास परवानगी दिल्यास ती परतण्याची शक्यता कमी आहे, असा दावा सीबीआयने केला होता. सीबीआयच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती चांडक यांच्या एकलपीठाने सीबीआयची याचिका योग्य ठरवून इंद्राणी हिला परदेश दौरा करण्यास नकार दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा