जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यातच काही दिवसांपासून अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर त्यांच्या लहान मुलासोबत काश्मीरच्या खोऱ्यात फिरत होते. याचे व्हिडिओ आणि फोटो शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत होते.
या हल्ल्याच्या घटनेनंतर त्यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या फोटो, व्हिडिओवर कमेंट्स करुन चाहते त्यांची विचारपूस करत होते. त्यानंतर लगेचच शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शोएब इब्राहिमनं सुखरुप असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहे.
शोएब इब्राहिमनं पोस्ट करत म्हटले आहे की, 'आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. मंगळवारी सकाळीच आम्ही काश्मीर सोडलंय आणि आता दिल्लीला सुरक्षित पोहोचलो आहोत. काळजी केल्याबद्दल सर्वांचे आभार.'