थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(US Firing ) अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कॉनकॉर्डच्या वार्षिक ख्रिसमस ट्री लाइटिंग समारंभात हा गोळीबार झाला असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
कॅरोलिनातील कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर असलेल्या कॉर्बिन अव्हेन्यूजवळील युनियन स्ट्रीटवर शुक्रवारी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा गोळीबार नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही.
Summery
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबार
गोळीबारात दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
ख्रिसमस ट्री लाइटिंग समारंभात गोळीबार