भारत-पाकिस्तान हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाला आहे. महाराष्ट्रातील घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवाशी जवान मुरली नाईक शहीद यांना आज पहाटे 3 वाजता LOC वर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आलं आहे. जम्मू-काश्मीर सीमेवर सुरू असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात जवान एम. मुरली श्रीराम नाईक यांना वीरमरण आले आहे. (India-Pakistan War) Read In English
मुरली नाईक हे जवान घाटकोपरच्या कामराज नगर येथील रहिवासी असून, ते मूळचे आंध्रप्रदेशातील आहेत. त्यामुळे या दुर्देवी घटनेमुळे मुंबईसह आंध्रप्रदेशातही शोककळा पसरली आहे. ममुरली नाईक यांच्या शौर्याला सलाम करत देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या या बलिदानाला प्रत्येक भारतीय कधीही विसरणार नाही.