Leh Ladakh protest 
देश-विदेश

Leh Ladakh protest : Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; कारण काय?

परदेशातून निधी स्वीकारताना संस्थेने अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई

  • एनजीओजची एफसीआरए नोंदणी रद्द

  • परदेशातून निधी स्वीकारताना संस्थेने अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न

( Sonam Wangchuk ) केंद्र सरकारने लडाखमधील स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) या सुप्रसिद्ध संस्थेवर कठोर कारवाई करत तिचा एफसीआरए परवाना रद्द केला आहे. सोनम वांगचुक यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका एनजीओजची एफसीआरए नोंदणी सरकारने रद्द केली आहे परदेशातून निधी स्वीकारताना संस्थेने अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात निष्पन्न झाले.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट 2025 रोजी संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यास तातडीने उत्तर मिळाले नाही. 10 सप्टेंबरला स्मरणपत्र पाठवल्यानंतर अखेर 19 सप्टेंबरला संस्थेकडून उत्तर सादर करण्यात आले. पण मंत्रालयाच्या तपासणीत त्या उत्तरावर समाधान व्यक्त करण्यात आलं नाही.

तपासात स्पष्ट झालं की, एफसीआरए खात्यात चुकीने स्थानिक निधी दाखल करण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 54,600 रुपयांची रक्कम तीन व्यक्तींकडून जमा झाली असून ती परकीय खात्यात दाखवली गेली. त्याचप्रमाणे, 2021-22 या वर्षात वांगचुक यांच्या नावावरून मिळालेल्या 3.35 लाख रुपयांच्या देणग्यांचा नीट तपशील सादर करण्यात संस्थेकडून त्रुटी झाल्या. शिवाय, परदेशी देणग्यांच्या हिशोबात आवश्यक पारदर्शकता दाखवण्यात अपयश आल्याचं आढळलं.

या सर्व कारणांमुळे मंत्रालयाने SECMOL चा एफसीआरए परवाना रद्द केला. परिणामी आता संस्थेला परदेशातून निधी स्वीकारण्याची परवानगी राहणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा