देश-विदेश

India Action Against Bangladesh : पाकिस्तानपाठोपाठ आता बांगलादेशचा नंबर, भारताने केली मोठी कारवाई

भारत-पाकिस्तान वादादरम्यान भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या प्रकरणी बांगलादेशीच्या 4 माध्यमांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

Published by : Prachi Nate

सध्या जगभरात भारत-पाकिस्तान वाद पेटून उठलेला पाहायला मिळत आहे. गेले दोन दिवस भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकामेकावर हवाई हल्ले करत आहेत. भारताने पाकिस्तानपाठोपाठ आता बांगलादेशविरुद्धही मोठी कारवाई केली आहे. भारताने दोन दिवसांपूर्वी सीमेपलीकडून 123 बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवले होते.

आता भारत-पाकिस्तान वादादरम्यान भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्या प्रकरणी बांगलादेशीच्या 4 माध्यमांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. भारताने युट्यूबला या चॅनेल्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वेळेचा विलंब न करता युट्यूबने या चॅनेल्सविरुद्ध चौकशी सुरू केली. त्यानंतर भारताने कारवाई केलेल्या या 4 चॅनेल्सला युट्यूबवरून नोटीसही पाठवण्यात आली.

यामध्ये जमुना टीव्ही, अ‍ॅक्टर टीव्ही, बांगलाव्हिजन आणि मोहोना टीव्ही या टीव्ही चॅनेल्सचा समावेश आहे. तसेच भारताने यूट्यूबवरील 16 पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स ब्लॉक केले होते. भारताने केलेल्या या कारवाईमुळे बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी सर्व माहिती ही बांगलादेशी माध्यमांनीच समोर आणली. दरम्यान यावर बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

चंद्रग्रहण 2025 : गर्भवती महिलांसाठी 'हे' खास उपाय

Kashi Vishwanath Mandir : काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना पगारवाढ; 30 हजारांचा पगार थेट 90 हजार

Latest Marathi News Update live : रात्री 9 नंतर लालबागच्या राजाचे विसर्जन होण्याची शक्यता

Russia's Major Attack in Ukraine : युक्रेनमध्ये रशियाचा मोठा हल्ला; जागतिक तणावात वाढ, अमेरिका चिंतेत