देश-विदेश

Millets Icecream : पठ्ठ्याची कमाल ! दुधाशिवाय तयार केले आयस्क्रीम, धान्याचाही समावेश

पण हा प्रयोग रायकरांनी कसा केला? त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

Published by : Shamal Sawant

सध्या उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच आयस्क्रीम खाण्याची प्रचंड इच्छा होते. पण दुधाशिवाय कधी आयस्क्रीम खाललं आहे का? पण आता हा अविष्कारदेखील समोर आला आहे. बंगळुरू येथील अभियंता गौतम रायकर यांनी दुधाचा वापर न करता आयस्क्रीम तयार केले आहे. पण हा प्रयोग रायकरांनी कसा केला? त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

सविस्तर माहिती :

गौतम यांनी 2021 साली संशोधन आणि विकासाचे काम सुरु केले. दुधाशिवाय आयस्क्रीम कसं तयार करता येईल? याबद्दल ते अभ्यास करू लागले. पण हे आयस्क्रीम कसे बनवावे? असे आव्हान त्यांच्यासमोर होते. लॉकडाऊन दरम्यान गौतम रायकर यांना व्हेगन बाजरीच्या आईस्क्रीमची जाहिरात दिसली. यामुळे त्यांच्या मनात एकच कुतूहल निर्माण झाले. त्यांनी यापूर्वी कधीही दुग्धजन्य पदार्थांपासून मुक्त मिलेट्स आईस्क्रीमबद्दल ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांनी दुधाशिवाय आयस्क्रीम बनवण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गौतमने दुग्धजन्य पदार्थांपासून मुक्त असलेल्या मिलेट्स आईस्क्रीमवर संशोधन करण्याचे ठरवले. मात्र यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि प्रिझर्वेटीव्ह नसावेत हादेखील त्यांचा प्रयत्न होता. पण सर्वात मोठे आव्हान होते ते डेअरी आईस्क्रीम गुळगुळीत आणि क्रिमी असणे महत्त्वाचे होते असे त्यांचे प्रयत्न होते.

यशस्वी प्रयत्न :

गौतम यांनी यासाठी चार प्रकारची भरडधान्य निवडली. ही भरडधान्य चॉकलेट, आंबा तसेच इतर घटकांमध्ये मिसळून अनेक प्रयोगदेखील केले. पण त्यांचे अनेक प्रयोग फसले. मात्र 2023 पर्यंत गौतम यांनी प्रयत्न करणे थांबवले नाही. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी लिकी फुड्स ब्रॅंड अंतर्गत मिलेट्स आयस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. या आयस्क्रीममध्ये बदाम आणि काजूचे दूध वापरण्यास सुरुवात केली.

किंमत किती ?

गौतमने तयार केलेल्या आयस्क्रीमची 100 मिलिच्या पॅकची किंमत 90 रुपये आहे. तसेच 4 लीटरच्या पॅकची किंमत 700 रुपये ते 1300 रुपये आहे. गौतम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गौतम महिन्याला 2 लाख रुपये म्हणजेच वर्षाला 24 लाख रुपये कमावत असल्याचे सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन