देश-विदेश

Swiggy : Swiggy ची 'ही' सेवा तडकाफडकी बंद ; अधिकृत घोषणाही नाही आणि...

2020 साली स्विगीने ही सेवा सुरू केली होती. ही सेवा देशातील 70 शहरांमध्ये उपलब्ध होती.

Published by : Shamal Sawant

स्विगी (Swiggy) कंपनीबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्विगीने त्यांची जीनी सर्व्हिस (Swiggy Ginie) बंद केली आहे. त्यामुळे अनेक स्विगी वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तु किंवा पार्सल पोहोचवण्याची ही सेवा कोणतीही घोषणा न करताच बंद केली आहे. 2020 साली स्विगीने ही सेवा सुरू केली होती. ही सेवा देशातील 70 शहरांमध्ये उपलब्ध होती. मात्र आता ही सेवा बंद करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, स्विगी ही सुरुवातीला अन्नपदार्थ घरपोच करायची. 2022मध्ये स्विगी जीनी ही सेवा तात्पुरती बंद केली होती. कोरोनानंतर घरपोच सेवा वाढली. त्यामुळे याचा परिणाम स्विगी जीनी या सेवेवर परिणाम झाला होता.

स्विगीची दुसरी सेवा 'स्विगी बोल्ट' (Swiggy bolt) सेवेवर लक्ष देणे यावर स्विगीचा भर होता. या सेवेमध्ये कमी वेळेत म्हणजे अवघ्या 10 मिनिटांत ग्राहकांच्या घरी अन्नपदार्थ घरपोच होते. त्यामुळे त्यापासून लक्ष विचलित होऊ नये, यासाठी कंपनीने जिनी सेवा बंद केली असावी असा अंदाज आहे.

स्विगी बोल्ट सेवेवर लक्ष केंद्रीत करत असताना प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोनं आपल्या 15 मिनिटांत अन्नपदार्थ आणि वस्तू पुरवणाऱ्या क्विक आणि एव्हरीडे या सेवा बंद केल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा