देश-विदेश

Data Breach : सर्वात मोठा सायबर हल्ला ! 1600 कोटी पासवर्ड ऑनलाईन लीक, Google चे निर्देश

सायबर गुन्हेगारांनी लाखो वापरकर्त्यांची माहिती धोक्यात

Published by : Shamal Sawant

अॅपल, गुगल, फेसबुक आणि टेलिग्रामच्या लाखो वापरकर्त्यांचे पासवर्ड ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचे म्हंटले जात आहे. ज्यामध्ये सुमारे 1600 कोटी पासवर्ड ऑनलाइन लीक झाले आहेत. या पासवर्डच्या मदतीने सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती चोरू शकतात. या डेटाच्या मदतीने सायबर गुन्ह्यांचा धोका वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फोर्ब्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की ऑनलाइन लीक झालेले क्रेडेन्शियल्स सरकारी प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांसह अॅपल, फेसबुक, गुगल, गिटहब आणि टेलिग्राम सारख्या मोठ्या कंपन्यांचे आहेत. संशोधकांना 184 दशलक्ष रेकॉर्ड असलेला एक गुप्त डेटाबेस सापडला जो असुरक्षित वेब सर्व्हरवर अपलोड करण्यात आला होता.

दरम्यान संशोधकांनी या डेटाबेसमधील 30 डेटासेटची तपासणी केली. त्यांना कॉर्पोरेट आणि डेव्हलपर प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांचे क्रेडेन्शियल्स, VPN लॉगिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह सुमारे 3.5 अब्ज रेकॉर्ड सापडले. या डेटा उल्लंघनाची माहिती समोर आल्यानंतर, जगातील आघाडीची टेक कंपनी गुगलने वापरकर्त्यांना 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच, त्यांनी त्यांच्या वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड अपडेट करण्यास सांगितले आहे.

गुगल वापरकर्त्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या चांगल्या सुरक्षिततेसाठी पासकी फीचर वापरण्यास सांगते. पासकी वापरून लॉगिन करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे, त्यामुळे ते दुहेरी सुरक्षा प्रदान करते. गुगल वापरकर्त्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या चांगल्या सुरक्षिततेसाठी पासकी फीचर वापरण्यास सांगते. पासकी वापरून लॉगिन करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे, त्यामुळे ते दुहेरी सुरक्षा प्रदान करते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा