पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप असणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तिला अटक करण्यात आली असून तिची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. याचपार्श्वभूमीवर आता पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही उल्लेख तिने या डायरीत केल्याची माहिती समोर येते आहे. तसेच ही डायरी 2012सालचं कॅलेंडर असलेली आहे, ज्यात ज्योतीनं पाकिस्तानबाबत तिला काय वाटतं ते लिहिल आहे. त्याचसोबत या डायरीत तिने पाकिस्तानचं वर्णन केलं असून पाकिस्तानात फिरण्यासाठी वेळ कमी मिळाल्याचंही म्हटलं आहे.
काय आहे ज्योती मल्होत्राच्या डायरीत?
2012 सालचं कॅलेंडर असलेली डायरी.
'हम सभी एक धरती, एक मिट्टी के बने है'.
पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला.
'सरहदो की दूरियां पता नहीं कबतक बरकरार रहेंगी, पर दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाएं'.
पाकिस्तान सरकारला मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकांसाठी गुरुद्वारे आणि मंदिरं खुली करावीत.
त्यांनी तसं केलं तर पाकिस्तानात हिंदू जास्त प्रमाणावर येतील.
1947 मध्ये फाळणीच्या वेळी जे वेगळे झाले आहेत असे लोक, अशी कुटुंबं एकत्र येण्यास मदत होईल.
पाकिस्तान खूप सुंदर आहे. क्रेझी आणि कलफुल आहे.