अमेरिकेतील डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेन एअरलान्सच्या फ्लाइट 1006 च्या इंजिनला आग लागली. डॅलस वर्थ आतंरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरणार होते. परंतु इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते विमान डेन्व्हरकडे वळवण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरले, पण विमानाच्या C-38 गेटवर पार्क केल्यानंतर इंजिनमधून काळा धुर येऊ लागला. त्यामुळे प्रवाशांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले असून सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
या अमेरिकेन एअरलान्सच्या विमानात एकूण 172 प्रवासी तर सहा क्रु मेंबर्स होते. विमान उतरल्यानंतर विमानातून काळा धुर येऊ लागला. सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेनंतर विमानाच्या तांत्रिक बिघाडांच्या कारणांची चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या प्रकाराचा संपुर्ण आढावा घेतला जात असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.