थोडक्यात
महागाई वाढली
वाढत्या महागाईचा सामान्यांच्या खिशाला फटका
लाहोर, कराचीमध्ये टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या
( Tomato price) महागाई सगळीकडे चांगलीच वाढली आहे. वाढत्या महागाईचा सामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. यातच आता लाहोर, कराचीसह देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानला आता मोठा महागाईचा धक्का बसला आहे. टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या असून बाजारात टोमॅटो आता चक्क ₹७०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
नागरिकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेल्याचे पाहायला मिळत असून पाकिस्तानच्या ताटातून टोमॅटोच गायब झाला आहे. लाहोर, कराचीत महागाईचा भडका उडाला आहे.