देश-विदेश

Mumbai Airport : आताची मोठी बातमी! श्रीनगरमध्ये अडकलेले पर्यटक मुंबईत दाखल

पहलगाम दहशदवादी हल्ल्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक सुरक्षित मुंबईत परतले

Published by : Prachi Nate

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशदवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. तसेच या दहशदवादी हल्ल्यादरम्यान महाराष्ट्रातून मुंबई आणि पुण्याचे काही लोक हे जम्मू-काश्मीरमध्ये अडकले होते.

याच लोकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः श्रीनगरला काल रवाना झाले होते. Akj6907 या स्पेशल विमानाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून जम्मू काश्मीर मधील अडकलेले पर्यटक विमानतळावर पोहोचले आहेत. या विमानाने येणारे प्रवासी हे पुणे येथील असून काही पर्यटक मुंबई ठाणे येथे राहणारे आहेत.

पुण्याच्या पर्यटकंसाठी मुंबईहुन पुण्याला जाण्यासाठी विशेष एसी बसचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 39 पर्यटक प्रवासी हे पुण्याला जातील. यावेळी पर्यटकांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे सचिव संजय मोरे तसेच आमदार आणि खासदारांसाह शिवसैनिक देखील उपस्थित आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan : पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Latest Marathi News Update live : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब

Mumbai : मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Gujarat Pavagadh Ropeway Accident : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; रोपवे कोसळून सहा जणांचा मृत्यू