पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारताने घेतला. 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला. 7 तारखेला सुरु झालेली युद्धजन्य परिस्थिती 3 दिवस कायम होती. मात्र नंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या संघर्षामध्ये यशस्वीरित्या मध्यस्ती केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. कोणतेही आण्विक युद्ध होऊ नये यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
भारताने अमेरिकेचा दावा नाकारला
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थिती सुधारण्यासाठी अमेरिकेने दोन्ही देशांना समजावण्याचे काम केले असल्याचे ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांना व्यापार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर ते शस्त्रसंधी करण्यास तयार असल्याचेदेखील ट्रम्प म्हणाले. मात्र त्यांचा हा दावा भारताने नाकारला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याबद्दल स्पष्ट सांगितले. ते म्हणाले की, "7 मे रोजी ऑपरेशन सिंदू झाल्यानंतर 10 मे रोजी सैनिकी कारवाई थांबेपर्यंत, त्यासाठी सहमती होईपर्यंत, भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये लष्करी परिस्थितीवर बातचीत झाली. त्यांच्यामध्ये सातत्यानं संवाद सुरु होता. पण यातील कोणत्याच चर्चेत व्यापाऱ्याचा विषय चर्चिला गेला नाही,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प ?
ट्रम्प यांनीदेखील एक भाषण केले होते. या भाषणादरम्यान ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मध्यस्थी केल्याचा दावा केला होता. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्यास अमेरिका त्यांना व्यापारात मदत करेल. तसेच दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची तयारी न दर्शवल्यास अमेरिका त्यांच्याशी कोणताही व्यापार करणार नाही. अशी भूमिका मी भारत-पाकिस्तानच्या नेतृत्त्वाशी संवाद साधताना घेतली. त्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले".