अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आंतरराष्ट्रीय वातावरण तापलं आहे. रशिया आणि चीनने या कारवाईचा तीव्र निषेध करत मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तातडीने सुटका करण्याची मागणी केली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं चीनने म्हटलं असून, अमेरिका-रशिया-चीन ट्रायंगलमध्ये तणाव वाढला आहे.
व्हेनेझुएलामधील प्रचंड तेल साठे हे या वादाचं मुख्य कारण आहे. व्हेनेझुएला रशिया आणि चीनला मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करत असून, अमेरिकेच्या ताब्यात हे साठे गेल्यास दोन्ही देशांचा व्यापार विस्कळीत होईल. अमेरिका या दोन्ही देशांना प्रतिस्पर्धी मानते, त्यामुळे ट्रम्पांची कारवाई हे डिवचण्याचं प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. चीनने अमेरिकेच्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन म्हटलं आहे.

दरम्यान, चीननेही अमेरिकेला घेरलं आहे. मादुरो यांच्या अटकेला विरोध करत तातडीने सुटका करण्याची मागणी केली असून, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं रक्षण करण्याची गरज असल्याचं ठणकावलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईमुळे जागतिक राजकारणात नवीन वळण आलं असून, तेल बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या काळात हा वाद आणखी तापेल की सौम्य होईल, याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.