देश-विदेश

UIDAI ची नवीन घोषणा ; आधारकार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर...

आधारकार्ड अपडेटसाठी नवीन नियम; 2025-26 पासून अंमलबजावणी

Published by : Shamal Sawant

आधारकार्ड हा आपल्या ओळखीचा महत्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अद्वितीय ओळखपत्र आहे. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक असते.आता यूआयडीएआयने आधारकार्ड संदर्भात नवीन घोषणा केली असून जुने आधारकार्ड अपडेट करण्यासाठी किंवा नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी काही कागदपत्रे बंधनकारक असणार आहे. याची अंमलबजावणी 2025-26 या वर्षापासूनच करण्यात येणार आहे.

आता आपल्याला नवीन आधारकार्ड काढायचे असेल किंवा आधीच्या आधारकार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी भारतीय पासपोर्ट (ओळख, पत्ता, नातेसंबंध व जन्मतारीख यांसाठी मान्य), पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शन कार्ड, कोणतेही सरकारी प्रमाणपत्र, ही कागदपत्रे दाखवणे बंधनकारक केली आहेत. त्याचबरोबर एका व्यक्तीसाठी एकच आधारकार्ड हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

एकापेक्षा जास्त आधारकार्ड ज्याच्याकडे असतील त्यांचे सर्वात आधीचे आधारकार्ड वैध मानले जाऊन इतर कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. मात्र या प्रक्रियेसाठी सुद्धा योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. भारतीय नागरिक, परदेशात राहणारे भारतीय, पाच वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलं, दीर्घकालीन व्हिसावर भारतात राहणारे लोक या सगळ्यांना ह्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

आधारकार्डामध्ये बायोमेट्रिक माहिती चेंज करायची असेल किंवा त्या संदर्भांत काही माहिती हवी असेल तर त्या साठी आपल्या जवळच्या आधारकार्ड केंद्रामध्ये भेट द्यावी लागेल. मात्र तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी यासारखे बदल करण्यासाठी UIDAIच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ही कामे करता येतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Swargate Accused : स्वारगेट प्रकरणातील आरोपीला दिलासा नाहीच! न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन नाकारल्याने आरोपीच्या अडचणीत वाढ

Mega Block Cancelled : मुंबईकरांना गणराया पावला! मध्य रेल्वेचा संडे मेगा ब्लॉक रद्द; मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट

Manoj Jarange Maratha Protest : ...पोलीसही गायब, आंदोलनात रात्रीच्या वेळेस खळबळ! संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Update live : आज सकाळी 10 वाजता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक