देश-विदेश

Pahalgam Terrorist Attack : हल्ल्याला सडेतोड उत्तर देणार, राजनाथ सिंह यांचा थेट इशारा

पहलगाम दहशदवादी हल्ल्यादरम्यान भारत सरकार कठोर पावले उचलेल असा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे.

Published by : Prachi Nate

काल जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशदवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. तसेच यावेळी दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर 50 हून अधिक वेळा गोळीबार केला. तसेच या दहशतवादी हल्ल्यात 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यादरम्यान पहलगाममध्ये महाराष्ट्रातील काही लोकांचा देखील सहभाग होता. जम्मू काश्मीर मधील दहशत वादी हल्ल्यात पुण्यातील कर्वेनगर भागातील दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

राजनाथ सिंह यांचा दहशदवाद्यांना थेट इशारा

"ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. ज्यांनी या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे मी देवाकडे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच इच्छा मागतो. आम्ही दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण बाळगतो. मी देशवासियांना आश्वासन देतो की, ही घटना लक्षात घेता भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळेल, दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल. त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू".

"या हल्ल्यादरम्यान मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर तसेच देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध करत बंदची हाक देण्यात आली. तसेच संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी