मे महिन्यात सुरू झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची चर्चा आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या युद्धामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने युद्ध थांबले असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्वतः दावा केला आहे. नेदरलँड्समधील हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही अण्वस्त्रे आहेत. मी म्हणालो, पहा, जर तुम्ही एकमेकांशी लढत राहिलात तर आपण कोणताही व्यापार करार करणार नाही. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी व्यापार कराराबाबत दोन्ही देशांशी अनेक वेळा चर्चा केली.
पुढे ट्रम्प म्हणाले की, "पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत. मी त्यांना समजावून सांगितले. मी म्हणालो, जर तुम्ही लढणार असाल तर आपण व्यापार करार करणार नाही. यानंतर त्यांनी सांगितले की मला व्यापार करार करायचा आहे. आम्ही अणुयुद्ध थांबवले. तथापि, ट्रम्प यांनी हा दावा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी याआधीही अनेक वेळा हे सांगितले आहे. दरम्यान ट्रम्प यांचा व्हिडीओ कॉंग्रेसने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काँग्रेसने ट्रम्पचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले की, 'ट्रम्प यांनी 18 व्या वेळी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले. मी स्पष्टपणे सांगितले - जर युद्ध झाले तर मी व्यवसाय करणार नाही. दोन्ही देशांच्या नेत्यांनी सांगितले- आम्हाला व्यापार करायचा आहे, म्हणूनच आम्ही युद्ध थांबवत आहोत. खरं तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला.
ऑपरेशन सिंदूर :
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 100 दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. चार दिवसांनंतर, 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर झाली.