थोडक्यात
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्था अडचणीत
अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद
टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम
(Donald Trump Tariff) भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफचा थेट परिणाम आता दिसू लागला असून, देशाच्या विकासदरावर त्याचे सावट पडल्याचे नवीन आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले.
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असल्याने, या निर्णयाचा भारताच्या निर्यातीवर मोठा फटका बसला. अमेरिकेत जाणारी जवळपास 70 टक्के निर्यात कमी झाली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना काही वस्तूंची निर्यात थांबवावी लागली. या टॅरिफचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
भारतातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली आहे. भारत-अमेरिकेचा व्यापार कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र, आता अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत वस्तू पाठवणे अवघड झाले आहे.
दरम्यान, भारताने रशियाकडून सप्टेंबर महिन्यात अधिक तेल खरेदी केली असून, ऑगस्टच्या तुलनेत हा आकडा वाढलेला आहे. तसेच इतर देशांसोबत व्यापारवाढीचे प्रयत्न सुरू आहेत. तरीसुद्धा टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसत असल्याने पुढील काही महिने आव्हानात्मक ठरू शकतात.