Mars 
देश-विदेश

मंगळावर दिसणारी ही आकृती काय आहे? मंगळावर पाण्याचा शोध?

नासाच्या मार्स रिकॉनिसेंस ऑर्बिटरने मंगळ ग्रहावर किडनी बीन्ससारखी आकृती शोधली आहे. या आकृतीमुळे मंगळावर जीवनाच्या शक्यतेचा शोध घेतला जात आहे.

Published by : Gayatri Pisekar

अमेरिकेच्या नासाने (National Aeronautics and Space Administration) मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी मार्स रिकॉनिसेंस ऑर्बिटर (Mars Reconnaissance Orbiter) पाठवलं आहे. आ ऑर्बिटरने मंगळ ग्रहावरील काही छायाचित्रांवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क सुरु आहेत.

मार्स रिकॉनिसेंस ऑर्बिटर (MRO) ने मंगळ ग्रहावर किडनी बीन्ससारखे दिसणारे (Giant Kidney Beans) ही आकृती नेमकी काय आहे. या आकृतीमुळे संशोधकांना मंगळ ग्रहावर जीवन होतं का याचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

उत्तर ध्रुवावर आढळली आकृती

मंगळाच्या उत्तर गोलार्धावर नासाच्या मार्स रिकॉनिसेंस ऑर्बिटरने एखाद्या द्विदलीय धान्यासारख्या दिसणाऱ्या या आकृतीचे छायाचित्र घेतले आहे. ही छायाचित्रे सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आली होती. मात्र, डिसेंबर २०२४ मध्ये ही प्रसारित करण्यात आली. या फोटोमध्ये मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील हे फुगवटे स्थिर दिसत आहेत. जे पृथ्वीवरील वाळवंटामधील स्थिती पेक्षा विपरीत आहेत. पृथ्वीवर वाळवंटात वादळामुळे वाळू उडत राहते. मात्र, मंगळावरील हे फुगवटे स्थिर आहेत. मंगळाच्या उत्तर ध्रुवात थंडी असल्याने या फुगवट्यांवर कार्बन डायऑक्साईडचा थर तयार झाला आहे. यामुळे मंगळावर होणाऱ्या वादळांचा यावर परिणाम होत नाही. हे फुगवटे मंगळावर ऋतू बदल होऊन बर्फ वितळायला सुरुवात होत नाही तोपर्यंत स्थिर राहतात.

मंगळावरील जीवसृष्टीचा शोध

लाईव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साईडचा स्तर स्थिर नाही. मंगळाच्या सूर्याभोवती परिभ्रमणानुसार बदलतो. लाईव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळ ग्रहावरील अक्षीय झुकावामुळे बर्फ स्वरूपातील कार्बन डायऑक्साईडचे गॅसमध्ये परिवर्तन होतं. यामुळे ग्रहावरील वायुमंडळ दाट होतं. हे दाट वातावरण दीर्घ कालावधीसाठी द्रव स्वरूपातील पाण्याला(H2O) आधार देण्यासाठी पुरेसे असू शकते. या शक्यतेनुसार मंगळ ग्रहावर सूक्ष्मजीव जीवन असू शकतं का यासंबंधीचा शोध घेतला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा