देश-विदेश

Tahawwur Rana legal Procedure: अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया काय असेल?

भारतातून कोणता वकील त्याचा खटला लढू इच्छित नसेल तर काय होईल? याबद्दल माहिती घेऊया.

Published by : Shamal Sawant

एआयए दहशतवादी तहव्वुर हुसेन राणाला प्रत्यार्पणासाठी भारतात आणलं गेलं आहे . त्याला औपचारिकरित्या अटक केली जाईल. त्यानंतर त्याला चौकशीसाठी प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू होईल. या प्रकरणात काय प्रक्रिया असेल त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. त्याचा खटला सुनावणीसाठी न्यायालयात कधी पोहोचेल? त्याला वकील मिळेल का? जर भारतातून कोणता वकील त्याचा खटला लढू इच्छित नसेल तर काय होईल? याबद्दल माहिती घेऊया.

काय असेल पुढील प्रक्रिया ?

मुंबईवरील 26\11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला तहव्वूर राणाला काही वेळेपुर्वी दिल्लीतील पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत दाखल झाले होते. भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाईल आणि नंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल. दिल्लीत आणल्यानंतर एनआईएतर्फे राणाला अटकेची कारवाई करण्यात येईल. सध्या राणा एनआईआयच्या ताब्यात आहे. राणाला अटक दाखवल्यानंतर त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टासमोर सादर केल जाईल. सुरक्षेच्या कारणात्सव तहव्वूर राणाला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टासमोर आणलं जाईल. तसचं गरजेनुसार विशेष न्यायाधिशांच्या निवासस्थानाही राणाला उभं केल जाऊ शकत.

त्यानंतर, कोर्टासमोर सादर केल्यानंतर एनआईए राणाच्या चौकशीसाठी कस्टडीची मागणी करेल, त्यामुळे एनआईए राणाला चौकशी करता ताब्यात घेईल. चौकशी मिळालेल्या माहितीद्वाई एनआईए अपडेट चार्जशीट दाखल करेल. तहव्वूर राणा संदर्भातील सुनावणी दिल्लीतील विशेष एनआईए कोर्टासमोर असेल. राणाला तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात येण्याची शक्य़ता आहे. यासाठी विशेष सुरक्षा देण्यात येणार आहे. राणाला इतर कैद्यापासून दूर ठेवल जाईल.

वकील ठेवण्याचा अधिकार :

जर तहव्वूर राणाला वकील ठेवायचा असेल . मात्र जर कोणताही वकील त्याचा खटला लढण्यास तयार नसेल तर न्यायालय स्वतः त्याला वकील देईल. केंद्र सरकारने या आधीच नरेंद्र मान यांना Special Public Prosecutor म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद