Vidhansabha Election

Devendra Fadnavis PC: दिवाळी संपताच मोठे फटाके फुटणार, काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात

पत्रकार परिषदे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठ वक्तव्य केलं. "दिवाळी संपताच मोठे फटाके फुटणार, काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात" असं म्हणतं पुढे ते म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

पत्रकार परिषदे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठ वक्तव्य केलं. "दिवाळी संपताच मोठे फटाके फुटणार, काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात" असं म्हणतं पुढे ते म्हणाले की, रवी राजा यांच्यासारखा एक मातब्बर नेता ज्यांनी महानगरपालिकेमध्ये कॉंग्रेसचे नेते म्हणून महानगरपालिका गाजवली मावळत्या महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून एक प्रचंड आक्रमक अशी भूमिका ही रवी राजांनी मांडली पाच टर्म सातत्याने रवी राजा हे महानगरपालिकेमध्ये निवडणून आले.

२३ वर्षे बेस्टचे सदस्य म्हणून काम केले आणि बेस्ट संदर्भात मुंबई महापालिकेत ऑथॉरिटी म्हणून रवी राजा यांकडे पाहिले जाते. त्यांचा काँग्रेस पक्षात मोठा कनेक्ट असून त्यांच्या अनुभवाचा फायदा येत्या काळात आम्हाला होईल. अनेक लोक संपर्कात येत आहेत. तर त्यांच्या संपर्कातून काँग्रेस ची अनेक मंडळी भाजपात येतील.

ज्या लोकांनी शहरात काँग्रेस टिकवली, ते आमच्याकडे आल्यामुळे नक्कीच फायदा होईल. सायन कोळीवाडा येथे तमिल सेल्वन यांना निवडून येण्यासाठी नक्की फायदा होईल. त्यामुळे आता जनतेच्याच मनात असा विश्वास निर्माण झाला आहे की, महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे एक सकारात्मकता जनतेमुळे आम्हाला देखील पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा