Vidhansabha Election

Devendra Fadnavis : मतदान केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

  • देवेंद्र फडणवीसांनी केलं मतदान

  • मतदान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरुन मतदान करावं. अशी माझी सगळ्यांना विनंती आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकसभेत याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता. काहीप्रमाणात तो कमी झालेला आहे. दुसरं लोकसभेच्या मतदानाची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारी आम्ही नंतर केल्या. मला असं वाटतं यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे, यातला जो फरक आहे तो भरुन काढेल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा