Pashchim Maharashtra

डिजिटल किडनॅपर; फोन पे वरून 67 हजार ट्रान्सफर करत बँक कर्मचाऱ्याची केली सुटका

Published by : left

पुण्यात मौज मजा करण्यासाठी एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याने (MPSC Student) एका बँक कर्मचाऱ्यांचे (Bank Employee) अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत अपहरणकर्त्याला लुबाडण्यासाठी आरोपीने डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) पर्याय निवडत 67 हजाराला लुबाडले. या प्रकरणी तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी (Swarget Police) गुन्हा दाखल करत गणेश दराडेला अटक केली आहे.

गणेश निवृत्ती दराडे हा मूळचा बीड (Beed) जिल्ह्यातील रहिवासी असून, तो सध्या पुण्यात एमपीएससीच (MPSC) शिक्षण घेण्यासाठी कर्वेनगर परिसरात राहायला आहे. 18 जानेवारी 2022 ला रोहित ईश्वर पवार हे बँकेत काम करणारे गृहस्थ अलिबागहुन आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रात्री उशिरा स्वारगेट डिपो वर आले असता, आरोपी गणेश निवृत्ती दराडे याने आपल्या मित्राच्या सहाय्याने त्यांना बळजबरीने त्यांच्या मोटारसायकलवर बसवून त्यांचं स्वारगेट डेपोतून अपहरण केलं. त्यानंतर आरोपींनी रोहित पवारला मुकुंद नगर येथील सत्यम शिवम बंगल्या जवळ नेऊन, त्याच्या मोबाईल बँक वॉलेट मधिल 66 हजार रुपये फोन पे अॅपने (Phone Pay App) आपल्या खात्यात ट्रान्सफर करून पळ काढला आहे.

या प्रकरणी रोहित ईश्वर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी (Swarget Police) गणेश निवृत्ती दराडे विरोधात अपहरण (Kidnap) करून बळजबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करताच स्वारगेट पोलिसांनी (Swarget Police) गणेश दराडेला अटक केली आहे. पुण्यात मौज मजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने, गणेश निवृत्ती दराडे ने हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Thane : ठाणेकरांना खुशखबर! मुंबई मेट्रो-11 प्रकल्पाला मंजुरी; ठाणे ते गेटवे प्रवास होणार अधिक सुलभ