A case has been registered against Narayan Rane and Nitesh Rane in the Disha Salian defamation case. A case has been registered at Malvani police station. Union Minister Narayan Rane and BJP leader Nitesh Rane had raised a number of questions on the Disha Salian issue.  
Mumbai

दिशा सालियन बदनामी प्रकरण | नारायण राणे, नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

Published by : Siddhi Naringrekar

दिशा सालियन ( disha salian) बदनामी प्रकरणी नारायण राणे, (narayan rane )  नितेश राणेंविरोधात (nitesh rane ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनप्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

दिशा सालियनची हत्या झाल्याची सांगत तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी एक ट्विट केलं होत की, 'खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले "बॉस " आणि आपण कुठे धावणार?', असे राणेंनी ट्विट केलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा