ऑलिम्पिक 2024

Olympic E-Sports: ऑलिम्पिक होणार E-स्पोर्ट्स सुरु; IOC कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर निर्णय

ऑलिम्पिकमध्ये ई- स्पोर्ट्स खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय 24 जुलै 2024 रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने एकमताने घेतला आहे.

Published by : Dhanshree Shintre

ऑलिम्पिकमध्ये ई-स्पोर्ट्स सुरु होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये ई- स्पोर्ट्स खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय 24 जुलै 2024 रोजी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने एकमताने घेतला आहे. IOC कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर हा निर्णय घेण्यात आला आहे. 2025 मध्ये सौदी अरेबिया इथं ई-स्पोर्टस स्पर्धेचं अनावरण होणार आहे. आयओसीचे थॉमस बाख यांनी माहिती दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स म्हणजेच याला संक्षिप्त स्वरुपात ई-स्पोर्टस असे म्हटले जाते. याद्वारे अनेक वैयक्तिक किंवा सांघिक खेळ हे व्हिडीओ गेमच्या माध्यामातून खेळवले जातात. दरवर्षी दशलक्ष प्रेक्षकांना ई-स्पोर्टस आकर्षित करत असल्याची माहिती आहे.

सिंगापूर येथे 2023 मध्ये एका आठवड्यासाठी ऑलिम्पिक होणार ई स्पोर्ट्स सुरु; IOC कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर निर्णय ई-स्पोर्ट्स IOC द्वारे आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 57 देशांतील 130 खेळाडूंनी 10 वेगवेगळ्या क्रीडास्पर्धेत भाग घेतला होता. तो एक यशस्वी प्रयोग होता असे समजल्यावर कमिटीने ऑलिम्पिकमध्ये ई-स्पोर्ट्सबाबत निर्णय जाहीर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा