ED summons have also been issued to his son Faraz Malik 
Mumbai

नवाब मलिकांच्या मुलालाही ईडीचे समन्स

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्राच्या राजकाणामध्ये सध्या ईडीचे (ED) धाडसत्र सुरु असून गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि सरतेशेवटी आठ तासांच्या चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आता एक मोठी घडामोड समोर येत आहे.

नवाब मलिक ( Nawab Malik ED )  यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक (Faraz Malik) यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून (JJ hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली