Mumbai

राऊत, खडसे यांचे फोन टॅप, रश्मी शुक्लावर गुन्हा दाखल

Published by : Jitendra Zavar

महाराष्ट्रात फोन टॅपिंगचा (phone tapping )विषय परत एकदा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse)आणि माझे फोन टॅप होत होते. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी सांगितले. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जात आहे, असे आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांनी सांगितले की, भाजप राज्यपाल, केंद्रीय तपास यंत्रणा आणि फोन टॅपिंगच्या माध्यमातून गोव्यात सत्ता आणण्याचा प्रयत्नात आहे. मात्र, ते शक्य नाही. त्यामुळे भाजपने आता केजीबी आणि सीआयए या संस्थांनाही मदतीसाठी घ्यावी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)हे गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे प्रभारी होते. त्यांनी गोव्यात 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवत विरोधकांचे फोन टॅप काम सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी मला काँग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले होते. त्यांनी आपला फोन टॅप होत असल्याची शंका व्यक्त केली.

रश्मी शुक्लाच्या अडचणीत वाढ
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत अधिकच वाढत आहेत. पुणे बंड गार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असतानाच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन 'टॅप' केल्याच्या आरोपाखाली कुलाबा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली