थोड्याच वेळात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद सुरु होणार आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय बोलतात आणि कोणती भूमिका घेणार? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत.
अद्याप राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती आहे अशी बातमी समोर आली. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीसांच्या नावाला संमती असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पत्रकार परिषदेत काय म्हणतील याकडे आता लक्ष लागलेलं आहे.