प्रातिनिधीक फोटो 
Vidhansabha Election

महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 288 मतदारसंघ, जवळपास 4500 मतमोजणी पथके मतमोजणीसाठी सज्ज

मतमोजणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं आहे. मतमोजणी प्रक्रियेविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहेत. अवघ्या काही तासांत निकाल लागणार आहेत. त्यामुळे मतदार आणि उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं आहे. मतमोजणी प्रक्रियेविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 288 मतदारसंघ, जवळपास 4500 मतमोजणी पथके मतमोजणीसाठी सज्ज

  • मुंबईत शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार

  • ज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती

मुंबईमध्ये कशी केली जाईल मतमोजणी?

मुंबईत उद्या 8 वाजता मतमोजणी सुरु होईल. यावेळी 3-4 लाखांहून अधिक पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी येतील. प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीद्वारे देखील पाहिली जाईल आणि आरओ तसेच सहाय्यक रिटर्निंग अधिकारी असणार आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी माहिती दिली आहे.

कशी असणार मतमोजणी प्रक्रिया?

महाराष्ट्रात मतमोजणी केंद्रावर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होण्यापूर्वी, स्ट्राँग रूम्स उपस्थित असलेल्या उमेदवारांसमोर किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडले जाईल. सकाळी 8.30 वाजता मतमोजणी सुरू होईल. यावेळी 3-4 लाखांहून अधिक पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी येतील. वाढलेल्या पोस्टल मतपत्रिका अधिक चांगल्या मतदानाची खात्री देतात. त्याच वेळी, मतमोजणीची वेळ वाढते म्हणून, आम्ही टेबलची संख्या वाढवली आहे. सर्व मतमोजणी केंद्रे 3-स्तरीय सुरक्षिततेने सुरक्षित आहेत. कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. परंतु प्रत्येक टेबलवर उमेदवारांचे प्रतिनिधीत्व करणारे एजंट असतील. जे काही चालले आहे ते बरोबर आहे की नाही ते स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घेतील. प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीद्वारे देखील पाहिली जाईल. तसेच आरओ, सहाय्यक रिटर्निंग अधिकारी चांगले प्रशिक्षित आहेत. मोजणीसाठी तयार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी