engineer-kirtankar-to-psi-rupali-kedar-travel 
Uttar Maharashtra

VIDEO : कीर्तनकार Engineer ते PSI : शेतकऱ्याच्या लेकीचा संघर्षमय प्रवास

Published by : Pankaj Prabhakar Rane

किरण नाईक – नाशिक : नाशिक येथील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कीर्तन करणाऱ्या रुपाली शिवाजी केदार या शेतकऱ्याच्या लेकीने एमपीएसी परीक्षेत आपली मोहोर उमटवलीय. रुपाली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालीय.नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दोडी हे तिच गाव. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या रुपालीने वयाच्या 9 व्या वर्षी घर सोडलं. घरी अध्यात्माचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा. आई वडलांच्या इच्छेनुसार चौथीत असताना तीने आळंदी गाठली.

मग सुरू झाला अध्यात्माचा प्रवास. अध्यात्मिक अभ्यासाबरोबरच त्यावेळी नोकरीनिमित्त आळंदीत असलेले रूपालीचे चुलते मनोहर केदार यांच्या मार्गदर्शनात तिचे नियमीत शिक्षणदेखील सुरुच होते. वयाच्या 13 व्या वर्षी कीर्तन व प्रवचनास सुरवात तीने केली. बालकीर्तनकार म्हणून तिला लोकं ओळखायला लागले. त्यानंतर अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर नाशिक मधील सपकाळ महाविद्यालयात तिने Electronics and Telecommunication इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला.

इंजिनीअरिंग चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. हे सगळं सुरू असताना कीर्तनही सुरूच होतं. कीर्तनामुळे शिक्षणासाठी आर्थिक मदत होत होती. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात नाशिक येथील युनिव्हर्सल फाऊंडेशनचे राम खैरनार यांचे मार्गदर्शन तिला लाभले तसेच नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले तिचे काका संतोष केदार यांचीदेखील तिला खूप मदत झाली.अशातच सन 2017 मध्ये तीचा नितीन सानप यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतरही तिने अभ्यास सुरूच ठेवला. यामध्ये तिच्या पतीनेही खूप मदत आणि पाठिंबा दिला. 2018 मध्ये तिने MPSC ची पहिली पूर्वपरीक्षा दिली. पण यश मिळालं नाही. परंतु अपयशाने खचून न जाता जोमाने अभ्यास सुरू ठेवला.

2019 मध्ये झालेल्या पुर्व व मुख्य परीक्षेत तिला यश मिळत गेलं. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन समाजप्रबोधन करण्याचं काम सुरूच होतं. हे करत असताना आपण दोन्हीपण गोष्टी साध्य करू शकतो हे तिने दाखवून दिलं. त्यानंतर परीक्षेच्या मुलाखतीत कीर्तनाचा चांगल्या पद्धतीने उपयोग तिला झाला. आणि या यादीत PSI पदावर तिने आपली मोहोर उमटवली. दरम्यान, माझे आजचे हे यश मी माझ्या आईला व माझ्या पतीला समर्पित करते, अशी भावना तिने व्यक्त केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?