Pudhari
मनोरंजन

"100 टक्के लव्ह जिहाद"; तुनिषा शर्माच्या काकांचा मोठा दावा

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे. यानंतर तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली आहे.

त्यानंतर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे. तिचे काका पवन शर्मा यांनी एक मोठा दावा केला आहे. तिचे काका म्हणाले की, "तुनिषाची आत्महत्या नक्की कशामुळे या प्रकरणी तपास सुरू आहे. त्यामुळे सखोल तपास न करता तिचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असं पोलीस कसं म्हणू शकतात? अद्याप पोलिसांनी आम्हा कुटुंबियांचा जबाब घेतलेला नाही. पण लवकरच तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की लव्ह जिहादमुळे हे समोर येईल"." तुनिषाची आत्महत्या हे 100 टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे. पोलिसांनी लव्ह जिहादच्या दृष्टीकोनातून या प्रकरणाचा तपास घ्यावा". असे त्यांनी म्हटले आहे.

तुनिषा शर्मा गेल्या काही दिवसांपासून शिझान खानसोबत रिलेशनमध्ये होती. आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. शिझानने तुनिषासोबतचं नातं संपवल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा