मनोरंजन

'3 इडियट्स' फेम अखिल मिश्रा यांचे निधन; इमारतीवरून पडून मृत्यू

'थ्री इडियट्स' चित्रपटातील अभिनेता अखिल मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अखिल यांच्या जाण्याने चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

'थ्री इडियट्स' चित्रपटातील अभिनेता अखिल मिश्रा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ते हैदराबादमध्ये शूटिंग करत असताना तेथील इमारतीवरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मित्र आणि अभिनय प्रशिक्षक कुलविंदर बक्षी यांनी अखिलच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अखिल यांच्या जाण्याने चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

अखिल मिश्रा यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी भंवर, उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी असे शो केले होते. तर, अभिनेत्याने डॉन अब्बा, हजारों ख्वैशीं ऐसी, 3 इडियट्समध्ये काम केले होते. अखिल यांनी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम केले. पण, त्याला 3 इडियट्समधील ग्रंथपाल दुबेच्या भूमिकेतून ओळख मिळाली. उत्तरन या मालिकेतील उमेद सिंग बुडेलाच्या भूमिकेतही त्यांना प्रसिध्दी मिळाली होती.

अखिल यांची पत्नी सुझान बर्नेट ही देखील व्यवसायाने अभिनेत्री आहे. अखिल यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मंजू मिश्रा होते. 1983 मध्ये लग्न झाल्यानंतर 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मंजूपासून विभक्त झाल्यानंतर सुझैन त्यांच्या आयुष्यात आली. अखिल यांनी 2009 मध्ये सुझान बर्नेटशी लग्न केले. हे त्यांचे दुसरे लग्न होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा