अभिनेत्री अमृता खानविलकर हिने तिच्या अभिनयाने तसेच नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अमृता सोशल मीडीयावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अमृताचा चाहतावर्ग देखील फार मोठा आहे.
अमृता खानविलकर आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिला एका चाहत्याने चक्क लग्नाची मागणीच घातली आहे. चाहत्याने सोशल मीडियाद्वारे तिला लग्नाची मागणी घातली आहे.
या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीने त्या चाहत्याला उत्तर दिलं आहे. यामध्ये चाहत्याने लिहिलं आहे की, अमृता खानविलकर, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. कायमस्वरुपी नवरा. मी इंटरेस्टेड आहे. मी इंडियन सुनील.
यावर अमृताने हा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, हॅलो इंडियन सुनील. मला ही ऑफर दिल्याबद्दल मी आभारी आहे. पण मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. जरी तुला कायमस्वरुपी नवरा व्हायचे असेल तरी. खरंच सॉरी. असे तिने त्या चाहत्याला उत्तर दिलं आहे.