Pathaan  Team Lokshahi
मनोरंजन

पठाण सिनेमातील नवीन गाणं झालं रिलीज

शाहरुख खानचा 'पठाण' हा आगामी चित्रपट 25 जानेवारी 2023ला सिनेप्रमींच्या भेटीला येणार आहे.

Published by : shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच सिनेप्रमींच्या भेटीला येणार आहे. शाहरूखचा पठाण चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खानसोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) दिसणार आहेत. याआधी पठाण चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तर आता या चित्रपटातील आजून एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पठाण चित्रपटातील नवीन गाण्याचे नावं 'झूमे जो पठाण' (Jhoome Jo Pathan) असे आहे. हे गाणे गायक अरिजीत सिंह आणि गायिका सुकृति कक्कड यांनी गायलं आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' हा आगामी चित्रपट 25 जानेवारी 2023ला सिनेप्रमींच्या भेटीला येणार आहे. पठाण चित्रपटाचे शूट भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या 8 देशांमध्ये झाला आहे. तसेच हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकतेच या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले होते, त्यानंतर दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावरून गदारोळ झाला होता. या गाण्यानंतर आता चित्रपटाच्या रिलीजलाही विरोध होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशील असेल, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार

Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका