Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Aamir Khan : सोशल मीडियावर खळबळ, आमिरचा माफीनामा व्हिडिओ डिलीट...

आमीरचा माफीनाम्याचा हा व्हिडिओ डिलीट झाल्यापासून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Published by : prashantpawar1

बॉलीवूड सुपरस्टार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan)यांचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट त्याच्या अपेक्षेप्रमाणे बॉक्सऑफिसवर उत्तमरीत्या कमाल दाखवू शकला नाही. आमिरच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा होत्या. पण आमिरचा लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. दरम्यान नुकताच आमिर खान प्रॉडक्शनने माफी मागणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्या अंतर्गत लोकांना वाटले की आमिर आपल्या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनासाठी माफी मागत होता. मात्र आता हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी आमिर खान प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'मिचामी दुक्कडम' असे लिहिले होते. ज्याचा अर्थ माझ्या सर्व चुका होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतो जो सांगत आहे की आपण सर्व माणूस आहोत आणि आपल्याकडूनच चुका होतच असतात. ज्या अंतर्गत कधी कधी आपण आपल्या बोलण्यातून किंवा कृतीतून लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने चिडवत असतो. यासोबतच कधी-कधी आपले हसण्याचे संवादही असे असतात जे हसण्याऐवजी दुखावतात. या दरम्यान माझ्याकडून तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी तुमची पूर्णपणे क्षमा मागतो. त्याचवेळी या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 'कल हो ना हो' या चित्रपटातील गाणे ऐकू आले. हा व्हिडिओ आमिर खान प्रोडक्शन पेजवरून दिसत नसला तरी आता हा व्हिडिओ आमिर प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवरून हटवण्यात आल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

खरंतर लोकांचा असा विश्वास आहे की, त्याचे अकाउंट हॅक झाले होते, त्यामुळे आमिरचा माफीनाम्याचा व्हिडिओ आता डिलीट करण्यात आला आहे. आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा बॉयकॉटचा बळी ठरल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकल्यामुळे या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मिळाले नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा