मनोरंजन

अनिल कपूर यांच्या अ‍ॅनिमलमधील लूक मागची खास गोष्ट; असा तयार झाला बलबीर सिंग!

ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलमध्ये अभिनेता अनिल कपूरच्या बलबीर सिंगची भूमिका भाव खाऊन गेली आणि याबद्दल अनिल कपूर यांचं कौतुक देखील झालं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलमध्ये अभिनेता अनिल कपूरच्या बलबीर सिंगची भूमिका भाव खाऊन गेली आणि याबद्दल अनिल कपूर यांचं कौतुक देखील झालं. ही भूमिका सुपरहिट तर ठरली पण अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी खूप ट्रेनिंग घेतलं आणि याच भूमिकेमागची खास गोष्ट त्यांनी त्यांचा सोशल मीडिया व्हिडिओमधून दाखवली आहे.

चित्रपटातील पडद्यामागील ही गंमत आणि अनिल यांची अपार मेहनत या व्हिडिओ मधून बघायला मिळतेय. अनिल कपूर यांना या भूमिकेसाठी विशेष कष्ट करावे लागले असून त्यांनी व्हिडिओमध्ये संपूर्ण चेहऱ्याचा मुखवटा कसा घातला याची गोष्ट उघड केली आहे. 40 वर्षांपासून विविध चित्रपटांमध्ये अनिल कपूर यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हा मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी पद्धतशीर दृष्टिकोनासाठी ओळखला जातो आणि यावेळीही दुहेरी भूमिकेच्या तयारीचा भाग म्हणून त्याने प्रोस्थेटिक्सचा चा वापर केला.

भूमिका आणि त्यासाठीची मेहनत अनिल कपूर यांनी घेऊन या भूमिकेला न्याय देऊन पुन्हा एकदा आपली कलाकारी सिद्ध केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा