मनोरंजन

रविवार 14 जुलैला सोनी मराठी वाहिनीवर रंगणार विशेष भाग

लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलन सोहळाच.

Published by : Dhanshree Shintre

लग्न म्हणजे कौटुंबिक उत्सवच... मित्रमंडळी, सगेसोयरे यांच्यासोबतच दोन जीवांना, दोन घरांना एकत्र आणणारा मिलन सोहळाच. प्रत्येकाची लग्नाविषयी स्वत:ची स्वप्नं असतात. भावी जोडीदाराची स्वप्न पाहाणाऱ्या आपल्या भूमिकन्येची म्हणजेच लक्ष्मीची सध्या जोरदार लगीनघाई सुरु आहे. लक्ष्मीच्या वडिलांनी सावकाराच्या मुलाबरोबर भूषणसोबत लक्ष्मीची सोयरीक जुळवली आहे. लग्नातील धमाल-मस्तीसोबत नववधू लक्ष्मीच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग असा सगळा आंनदी माहोल असताना लक्ष्मीच्या लग्नात एक वेगळाच ट्विस्ट येतो. नक्की काय घडतं...? हे यात पाहायला मिळणार आहे. रविवार 14 जुलै रात्री 8 वा. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ या मालिकेचा लग्न सोहळ्याचा विशेष भाग रंगणार आहे. मेहंदी, हळद संगीत असा सगळा माहोल यात असणार आहे.

या सगळ्या आनंदी वातावरणात या सगळ्याला कशी कलाटणी मिळणार? आणि या सगळ्यामागे कोणाचा हात असणार? आता बळी आणि लक्ष्मी सगळ्या प्रकाराला कसे सामोरे जाणार? लक्ष्मीचं लग्न निर्विघ्न पार पडणार का? तिला कोणाची साथ मिळणार? की बळीला साऱ्या गावासमोर अपमान सहन करावा लागणार? या सगळ्या गोष्टीचा खुलासा येत्या रविवार 14 जुलै रात्री 8 वा. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ या मालिकेच्या विशेष भागात होणार आहे .

‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊ वृत्तीच्या कन्येची कथा ‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ मालिकेतून आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड