मनोरंजन

राजभवनात रंगला "मधुरव : बोरू ते ब्लॉग'चा खास प्रयोग; राज्यपालांकडून पाच लाखांचे बक्षीस जाहीर!

मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास,

Published by : Siddhi Naringrekar

मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी,गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम म्हणजे "मधुरव - बोरू ते ब्लॉग".मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख तसेच अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला.

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, निर्माते अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार शिवाजी साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांच्यासह दिगदर्शक आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, राजेश मापुस्कर, अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली खरे, रसिका सुनील संगीतकार कौशल इनामदार, गायक मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

'मधुरव : बोरू ते ब्लॉग' ही मराठी भाषेप्रती सार्थ अभिमान जागविणारी नाट्यकृती असून नाट्याचे प्रयोग सर्वत्र आणि विशेषतः महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. तसेच मराठी भाषिक माणूस हा नाट्यप्रयोग पाहून अधिकाधिक प्रभावित आणि गौरवा वाटेल असे ही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी त्यांनी या कार्यक्रमाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. "मधुरव - बोरू ते ब्लॉग' ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर ने साकारली आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा श्वेता बापट, अंकिता जठार, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला आले आहेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नागपुरात ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरूच

Work Hours : आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

Pune Metro : पुणेकरांना मिळणार 2 नवीन मेट्रो स्थानके,सरकारकडून 683 कोटींची मंजुरी

Ashish Kapoor : टीव्ही अभिनेता आशिष कपूरला अत्याचाराच्या आरोपाखाली पुण्यातून अटक