मनोरंजन

‘आई कुठे काय करते’मधील शेखरची पोस्ट पाहा, म्हणाला, “५ वर्ष वाट पाहिली पण…”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेसोबत त्यातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

Published by : Siddhi Naringrekar

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेसोबत त्यातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. या मालिकेमध्ये संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosale) पहिल्या नवऱ्याची भूमिका साकारणारा शेखर म्हणजेच अभिनेता मयुर खांडगे (Mayur Khandge). त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे.

नुकतेच त्याने त्याच्या सोशल मिडिया (Social Media) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट साऱ्यांचे लक्ष वेधत आहे. मयुर आता लवकरच मराठी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाचं पोस्टर, गाणं, ट्रेलर शेअर करत याबाबत माहिती दिली. ‘हबड्डी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपट तब्बल 5 वर्षानंतर प्रदर्शनासाठी तयार झाला आहे.

मयुरने पोस्ट करत लिहिले की, “प्रतिक्षा संपली. १८ जुलैला ‘हबड्डी’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. जवळपास आम्ही सगळ्यांनी ५ वर्ष या दिवसाची वाट पाहिली आणि अखेरीस तो दिवस आला आहे. ते म्हणतात ना बराच काळ वाट पाहिली की त्याचं चांगलं फळ मिळतंच. असंच काहीसं आता घडलं आहे.”

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला