मनोरंजन

Aai Tulja Bhawani: उदे गं अंबे उदे! "आई तुळजा भवानी" मालिका घरा घरात पोहचणार, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

कलर्स मराठी या वाहिनीच्या टीआरपीमध्ये बराच चढ-उतार पाहायला मिळाला. गेल्या काही महिन्यांमध्ये कलर्स मराठीचा टीआरपी उरताना पाहायला मिळाला. यामुळे वाहिनेचा प्रेक्षकवर्ग हा ढासाळताना दिसला.

Published by : Team Lokshahi

कलर्स मराठी या वाहिनीच्या टीआरपीमध्ये बराच चढ-उतार पाहायला मिळाला. गेल्या काही महिन्यांमध्ये कलर्स मराठीचा टीआरपी उरताना पाहायला मिळाला. यामुळे वाहिनेचा प्रेक्षकवर्ग हा ढासाळताना दिसला. अधिक प्रेक्षकवर्ग कमी न होण्यासाठी कलर्स मराठी या वाहिनीने जुन्या मालिकांचे शेवट करून नवीन मालिकांची सुरुवात केली आणि टीआरपीमध्ये भर आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान कलर्स मराठी या वाहिनीला या प्रयत्नात यश मिळताना दिसले. तेवढ्यातच आता कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या 5 व्या सिजनला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होताच कलर्स मराठी या वाहिनीचा टीआरपी झपाट्याने वाढताना दिसला आहे. त्यात बिग बॉस मराठीच्या होस्टींगसाठी रितेश देशमुख याला पाहताचं रितेश देशमुखचा चाहतावर्ग ही कलर्स मराठी या वाहिनीजवळ खेचला गेला आहे.

यातच आता कलर्स मराठी या वाहिनीने एका नवीन ऐतिहासिक आणि दैवी शक्तीसंबंधीत गाथा सांगणाऱ्या मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेची एक झलक दाखवणारी पोस्ट कलर्स मराठीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टला कॅप्शन देत कलर्स मराठीने प्रेक्षकांना सांगितलं आहे, "अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजा भवानी’ची गाथा येतेय लवकरच आपल्या कलर्स मराठीवर..!" अवघ्या जगाची जननी ‘आई तुळजा भवानी’ लवकरच प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि तिची गाथा प्रक्षकांना जाणून घेता येणार आहे. ही मालिक कधी सुरु होणार याबद्दल अजून तरी कोणतीच माहिती वाहिनेनी दिलेली नाही. तरी पोस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे यात छत्रपती शिवाजी महाराज हे आई तुळजा भवानी समोर बसलेले दाखवले आहेत आणि अचानक आई तुळजा भवानी प्रकट होऊन महाराजांच्या हातात तलवार देताना दिसत आहे. तरी आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?