मनोरंजन

अंबानीलाच ठेवला ड्राइव्हर; रणबीर कपूरच्या त्या व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

नुकताच सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी स्वत: महागडी गाडी चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

मुकेश अंबानी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. नुकताच सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी स्वत: गाडी चालवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी आकाश स्वत: कार चालवत असताना त्याच्या बाजूला अभिनेता रणबीर कपूर बसला होता. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

आकाश ड्रायव्हरच्या सीटवर बसला होता आणि रणबीर आकाशच्या शेजारी बसला होता. आकाश आणि रणबीर लँबोर्गिनी उरुस एसयूव्हीसारख्या महागड्या कारमधून फिरत होते. ज्याची किंमत सुमारे ४ कोटींपेक्षा जास्त आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका सुजरने ड्राइव्हरसुद्धा अंबानींनाच ठेवलं का?, अशी खोचक कमेंट केली आहे.

नुकताच मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या रिलायन्स ब्रँड्सने आलियाची कंपनी खरेदी केली आहे. आलिया भट्टने लहान मुलांच्या कपड्यांसाठी 'एड-ए-मम्मा' हा ब्रँड लाँच केला होता. वृत्तानुसार अंबानी यांनी आलियाचा ब्रँड ३०० ते ३५० कोटी रूपयांच्या खरेदी केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."