मनोरंजन

अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क
दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या आगामी 'पुष्पा' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन याने ट्विटकरत या चित्रपटाबद्दल माहिती दिली. सुकुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक असून, हा चित्रपट १३ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. तसेच हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

आता पुष्पा या बहुप्रतिक्षित चित्रपटाची तारीख जाहीर केली असून, चित्रपटगृहात रिलीज केला जात आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, धनंजय आणि सुनील दिसणार आहेत. निर्माते नवीन यार्नेनी आणि रविशंकर याबाबत म्हणतात की, "पुष्पाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. पॅन इंडिया प्रेक्षकांना ध्यानात ठेवून आम्ही हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट बनविला आहे. जेणेकरून सर्व प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल.

या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असून अल्लू अर्जुनचा मागील चित्रपट 'अला वैकुंठपुरूमूलो' नेटफ्लिक्सवरही आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. 2020 मधील सर्वात मोठ्या म्हणून हिट झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttarakhand landslide : उत्तराखंडमध्ये भूस्खलनात दोघांचा मृत्यू; सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Maharashtra Police : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ, एक पोलीस अंमलदार' योजना

Latest Marathi News Update live : सण उत्सवासाठी राज्यात 'एक मंडळ एक पोलीस अंमलदार'

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली