मनोरंजन

Aamir Khan: आमिर खान आता तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? 'या' अभिनेत्रीसोबत होत आहे चर्चा...

किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सोशल मीडियावर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल आता चर्चांना उधान आलं आहे.

Published by : Team Lokshahi

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं असा बॉलिवूडचा क्यूट बॉय म्हणजेच आमिर खान हा त्याच्या 90's च्या दशकातील चित्रपटांमुळे लोकप्रिय झाला. त्याचे जुने चित्रपट आज ही लोक तितक्याच आवडीने पाहतात. नुकतेच त्याचे काही चित्रपट आले जे जास्त काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू शकले नाही. 'लाल सिंह चड्ढा', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'सीक्रेट सुपरस्टार' यांसारख्या चित्रपटात तो दिसला पण दुर्दैवाने त्याचे हे चित्रपट जास्त काळ चालू शकले नाही. आमिर खान हा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. आमिर खानने आतापर्यंत स्वतःची दोन लग्न उरकली आहेत. मात्र काही कारणाने त्याची ती दोन्ही लग्न जास्त काळ टिकू शकली नाही. किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सोशल मीडियावर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल आता चर्चांना उधान आलं आहे. अनेक वेळा त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोललं जायचं मात्र यावर आमिर खानने स्वतःहून काही वक्तव्य मांडल नव्हतं.

यावेळी त्याच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचं नाव फातिमा सना शेख हे आहे. 'दंगल' या चित्रपटात फातिमा आणि आमिर खान दोघंही एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात होण्यास लागली. खूप काळ या अफवा सुरुच होत्या मात्र आता या अफवांवर फातिमा सना शेख आणि आमिर खान या दोघांनी ही मौन सोडलं आहे. एका पॉडकास्ट दरम्यान आमिर खान म्हणाला, "लग्न हा एक कॅनव्हास आहे आणि ते कसे रंगवतात हे दोन लोकांवर अवलंबून असते. मी आता 59 वर्षांचा आहे, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते अवघड जात आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. माझी मुले आणि माझे भाऊ आणि बहिणींसह मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधला आहे. ही नाती मला जपायची आहेत".

तर याचसोबत फातिमा सना शेख देखील स्वतःची भूमिका मांडत म्हणाली, "माझी आई हे सर्व टीव्हीवर पाहायची त्यावेळेस पेपरमध्ये किंवा टीव्हीवर माझ्याबद्दल काही आलं तर ती मला सांगायची आणि म्हणायची तुझं नाव आलं आहे. या अशा बातम्यांवरून तीला खूप वाईट वाटलं आणि हे खूप विचित्र होते", असं म्हणतं फातिमाने आपले मत व्यक्त केले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?