Aamir Khan Team Lokshahi
मनोरंजन

Aamir Khan : शुटिंग दरम्यान सेटवर झाली आमिरला दुखापत....

आमिरच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या लांबलचक सीनचं शूट पुन्हा पुढे ढकलण्यात यावे असे आमिरला वाटत नव्हते.

Published by : prashantpawar1

बॉलिवूडचे मिस्टर सुपर परफेक्शनिस्ट म्हणून नामांकित असणारे आमिर खान (Aamir Khan) यांचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटात आमिर खान लाल सिंग चड्ढा यांची भूमिका साकारली आहे. जो त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध व्यवसायांमध्ये दिसणार आहे. त्यापैकी एक क्रॉस-कंट्री धावपटू देखील आहे. लाल सिंग चड्ढा यांच्या दीर्घकाळाची कल्पना प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक असताना मुख्य भूमिकेत असलेल्या आमिर खानने सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान त्याच्या मर्यादा खूप ढकलल्या आहेत. आमिर खानने चित्रपटाच्या या लांबलचक सीक्वन्सचे शूटिंग सुरू केले तेव्हा त्याचा गुडघा दुखावला गेला. तरीही सर्व अडचणींनंतरही आमिर खान मागे हटला नाही. यादरम्यान आमिर सतत पेनकिलर घेत होता जेणेकरून त्याला धावण्यामुळे होणाऱ्या त्रासात आराम मिळावा. अखेर दुखापत असूनही आमिर खानने धावणे का निवडले ? यामागचे कारण म्हणजेच महामारी.

खरं तर कोविडमुळे लाल सिंग चड्ढाचे शूटिंग आधीच खूप लांबले होते. अशा परिस्थितीत आमिरच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या या लांबलचक सीनचं शूट पुन्हा पुढे ढकलण्यात यावं असं आमिरला वाटत नव्हतं. शूट खूप ग्रिलिंग आणि ओव्हर टॅक्सिंग झाले असले तरी देखील त्यानं हार मानली नाही आणि त्याने सर्वोत्तम शॉट दिला.

लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा 'रनिंग सीन' हा सर्वाधिक चर्चेत असलेला सीन आहे. या क्रमात लाल सिंग चड्ढा वर्षानुवर्षे धावत जातो. भारतातील प्रत्येक सुंदर स्थानावरून जातो आणि त्याच्या आयुष्यातील आणखी एक मैलाचा दगड गाठतो. आमिर खान प्रॉडक्शन किरण राव(Kiran Rao) आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा हा चित्रपट करीना कपूर खान(Kareena Kapoor) , मोना सिंग(Mona Singh) आणि चैतन्य अक्किनेनी(Chaitanya Akkineni) यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?