मनोरंजन

आमिर खान पुन्हा वादात! कियारा अडवाणीसोबतच्या जाहिरातीवरून नवा वाद

बॉलीवूड अभिनेता आमिर खान ट्विटरवर ट्रोल होत आहे. कारण त्याची नवीन जाहिरात. एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या ताज्या जाहिरातीत आमिर आणि कियारा अडवाणी दिसत आहेत. या जाहिरातीत दोघेही परंपरा बदलण्याबाबत बोलत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

बॉलीवूड अभिनेता आमिर खान ट्विटरवर ट्रोल होत आहे. कारण त्याची नवीन जाहिरात. एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या ताज्या जाहिरातीत आमिर आणि कियारा अडवाणी दिसत आहेत. या जाहिरातीत दोघेही परंपरा बदलण्याबाबत बोलत आहेत. या जाहिरातीत आमिर खान आणि कियारा अडवाणी हे जोडपे म्हणून दिसले होते. लग्नानंतर प्रचलित परंपरेच्या विरोधात, वराऐवजी वर म्हणजेच आमिर खान मुलीच्या घरात प्रवेश करतो. जाहिरातीत आमिर पुढे म्हणतो की, शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा का चालू ठेवाव्यात?

आता आमिर खानच्या या जाहिरातीने खळबळ उडाली असून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. बरेच लोक आमिरचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर करत आहेत, ज्यामध्ये अभिनेता धर्म आणि परंपरांबद्दल बोलत आहे. आमिर खानचा सोशल मीडियावर शेअर होत असलेला जुना व्हिडिओ एका पत्रकार परिषदेतील आहे. ज्यामध्ये एका पत्रकाराने अभिनेत्याला प्रश्न केला की, "इरफान खानने रमजानमध्ये उपवास करण्याऐवजी स्वतःमध्ये डोकावायला हवे, कुर्बानीच्या नावाखाली प्राण्यांची बळी दिली जात आहे... यावर तुमचे काय म्हणणे आहे?'

यावर आमिर खान उत्तरतो, “धर्म ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे. धर्माबद्दल प्रत्येकाचे वैयक्तिक मत आणि विचार आहे. माझे स्वतःचे मत आहे, त्यामुळे मी कोणाच्या मतावर भाष्य करू इच्छित नाही." असे आमीरने म्हटले होते. मात्र नेटकऱ्यांना ही जाहिरात मुळीच पटली नसल्याचं चित्र आहे. त्यांच्या या जाहिरातीला सोशल मीडियावर जोरदार विरोध होताना दिसतोय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा